“कृषी हवामानशास्त्र ” हा कृषी विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमांसाठी उपयुक्त असा प्रारंभिक पाठ्यपुस्तक आहे. याशिवाय, कृषी क्षेत्रातील व्यावसायिक तसेच हवामान आणि वातावरणाचा शेतीवर होणारा परिणाम जाणून घेऊ इच्छिणाऱ्या अभ्यासकांसाठी महत्त्वपूर्ण माहितीचा स्रोत ठरेल. मूलभूत संकल्पना : या पुस्तकात मूलभूत संकल्पना वातावरणातील घटक, रचना, प्रक्रिया, त्यांची कारणे आणि परिणाम तसेच कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाच्या हवामानशास्त्रीय घटकांचा समावेश करण्यात आला आहे. हे घटक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जवळपास सर्व हवामानविषयक प्रक्रियांवर प्रभाव टाकतात म्हणूनच, यावर विशेष भर देण्यात आला आहे. उपयोगिता: या पुस्तकात कृषी उत्पादनासाठी हवामान आणि वातावरण कसे परिणामकारक ठरते, तसेच हवामानस्थिती आणि हवामान बदल यांचा कृषी उत्पादनावर होणारा प्रभाव, तसेच त्या परिणामांना सौम्य करण्याच्या किंवा त्यांच्याशी जुळवून घेण्याच्या उपाययोजना यांचा सखोल विचार येथे केला आहे. हवामान अंदाज आणि हवामान जोखमीचे मूल्यमापन तसेच जोखीम कमी करण्याच्या आणि त्यासाठी उपाययोजना करण्याच्या तंत्रांची माहिती स्थानिक ते जागतिक स्तरावर माहिती दिली आहे.
TECHNOLOGY & ENGINEERING / Agriculture / General
Krishi Hawamanashastra: Ek Sankalpna
₹399.00
By: Dr. Santosh Tukaram Yadav, Dr. Jaywant Dattaji Jadhav & Shrimati Nanda Raghunath Wagh
ISBN: 9789366659008
Category: TECHNOLOGY & ENGINEERING / Agriculture / General
Delivery Time: 7-9 Days
Reviews
There are no reviews yet.